आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे ‘सेवा पंधरवाडयाचा’ उत्साहात शुभारंभ

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे निरीक्षण तांड्रा, जिल्हा सचिव विनोद चौधरी, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, प्रमोद भोस्कर, सिनू इसारप, गणेश कुटेमाटे, सतीश बोन्डे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, मानस सिंग, कुसुम सातपुते, सुरेंद्र जोगी, धनराज पारखी, दिलीप कांबळे, सुनील राम, रज्जाक शेख उपस्थित होते
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ७७५ रुग्णांना नि:शुल्क चश्मे वाटप करण्यात आले. तसेच केक कापून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर जिल्ह्यातील मेहसणा येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्म झाला. त्यांनी सन १९७२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्याला सुरुवात. सन १९८७ मध्ये गुजरात भाजपाचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी सन १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. सन १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची निवड झाली आणि ५ राज्यांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. सन २००१-२०१४ मध्ये गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सन २०१४-आतापर्यंत नव्या भारताची पायाभरणी करून आणि भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी ऐतिहासिक कामगिरी केली.
संचालन भाजयुमोचे नेते अमोल थेरे यांनी केले तर आभार भाजयुमोचे नेते गणेश कुटेमाटे यांनी मानले.
यावेळी भाजपाचे उमेश दडमल, हेमंत कुमार, गणेश राजुरकर, योगेश आरापेल्ली, बादल रामटेके, निशा उरकुडे, सिमा पारखी, लता आवारी, सारिका भोंगळे, माधवी भगत, पुष्पांजली काटकर, माया डंभारे, वर्षा सातपुते, अर्चना क्षीरसागर, सुनंदा लिहीतकर, प्रेमीला कोयडा, प्रतिभा मुळे, प्रीती धोटे, वंदना भोंगळे, प्रीती गुल्हाने, कल्पना वैरागडे, नंदा ताजने, गीता पाचभाई व मोठया संख्येत नागरीक उपस्थित होते.