चंद्रपूर येथे सन्मान संविधानाचा आधार बहुजनांचा कार्यक्रमाचे आयोजन…

चंद्रपूर : भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त, संविधानाच्या समर्थनार्थ आणि सन्मानार्थ, चंद्रपूर येथे भव्य ‘ सन्मान संवींधानाचा आधार बहुजनांचा’ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता न्यू इंग्लिश ग्राउंड, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होणार आहे.या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अमित वाघमारे, डॉक्टर प्रशांत रामटेके ,प्रा दुष्यंत नगराळे विनोद देशपांडे यांनी केले
या सोहळ्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आद. डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांची विशेष मार्गदर्शन व उपस्थिती असणार आहे. ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.
कार्यक्रमात संविधानाचा विचार आणि संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रॅपर विपिन तातड (झुंड फिल्म फेम) आणि महाराष्ट्रात विद्रोही नावाने प्रचलित असणारे रॅपर जी (नांदेड) यांची जोशपूर्ण सादरीकरणे होणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल तसेच पराग कांबळे, हर्षल शिंदे ,करून आनंद ,परमेश्वर लाभने, अल्काताई मोटघरे, रूपाली वानखेडे आयोजक म्हणून विशेष परिश्रम घेत आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. नेताजी भरणे ,सूत्रसंचालन सचिन फुलझेले व आभार प्रदर्शन ऍड. राजेश वनकर करतील.
हा ऐतिहासिक सोहळा भारतीय संविधाना प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या आधारस्तंभाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे



