ग्रामीण वार्ता
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली बु. येथे विविध वेशभूषा स्पर्धा चे आयोजन

चंद्रपूर : आनंददायी शनिवार अंतर्गत विना दप्तराची शाळा या दिनांक 20 सप्टेंबर 2025 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली बु येथे विविध वेशभूषा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले यामध्ये माननीय राकेश शिंगाने अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व सौ भाग्यश्री एकरे उपाध्यक्ष तसेच प्रतिभा कांबळे, सौ सुषमा मठ्ठे, सौ लीना माकोडे, प्रियंका एकरे आणि इतर सर्व माता पालक उपस्थित होते.

या वेशभूषा स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी आपल्या कलागुणांना सादर केले. या आनंदायी शनिवारमध्ये दर शनिवारी असे नवनवीन उपक्रम घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली बु. हे आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.



