क्राईम न्युज

चंद्रपुर येथील ड्रग्य माफिया कडुन MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 2,00,260/- रु चा माल हस्तगत –  स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कारवाई

चंद्रपूर : दिनांक ०४/१२/२०२५ रोजी उपविभाग, चंद्रपुर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस पथक सोबत मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करणे कामी रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर आरोपी नामे प्रांजल राकेश तिवारी, वय-२४ वर्ष, रा. माळा कॉलनी, क्वार्टन नंबर ३०८, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर तसेच आरोपी अदनान जाकीर शेख, वय-२४ वर्ष, रा. माळा, ऑटो कॉलनी, क्वार्टर नंबर बी. २०१, चंद्रपुर हे मोटार सायकलने नागपुर रोड, धाब्या जवळ, चंद्रपुर येथे येत आहे अशा खबरे वरून नमुद आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन १३,५० ग्रॅम एम. डी (MEPHEDRONE) सदृश्य पांढरे रंगाचे ड्रग्ज पावडर व मोटार सायकल, नगदी रूपये तसेच दोन मोबाईल असा एकुण २,००,२३०/-रूपयाचा माल जप्त करून आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे N.D.P.S. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा  रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, पोशि शशांक बदामवार, पोशि हिरालाल गुप्ता, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये