सोन्या / चांदीचे दागिने व मुद्देमालासह इसमास अटक – स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…

चंद्रपूर : दिनांक 16/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथक रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबीर द्वारे माहिती मिळाली कि, 01 इसम चोरीचा मुद्देमाल सोनारास विकण्याकरिता निमवाटिका रयतवारी कॉलरी चंद्रपूर जवळ येणार असल्याचे खात्रीशीर खबरेवरून निमवाटिका जवळ सदर इसमास पंचासमक्ष ताब्यात घेतले असता त्याचे अंगझडतीत सोन्या/चांदीचे दागिने व नगदी रुपये असा मुद्देमाल मिळुन आला. सदर इसमास मुद्देमालाबाबत विचारले असता वरोरा व भद्रावती येथे घरफोडी केल्याचे सांगितले. सदर अरोपीकडून खालील घरफोडी चे गुन्ह्यातील मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
उघडकीस आणलेले गुन्हे:-
1) पोस्टे वरोरा अप क्र.574/25 कलम 305(a),331(3), 331(4) BNS 2023
2) पोस्टे वरोरा अप क्र 417/25 कलम 305(a), 331(3), 331(4) BNS 2023
3) पोस्टे भद्रावती अप क्र 220/25. कलम 305(a),331(3), 331(4) BNS 2023
एकूण जप्त मुद्देमाल सोन्या/चांदीचे दागिने व नगदी असा 86,270/- रु चा माल
तसेच सदर 02 आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करिता तपासी अंमलदार पो.स्टे वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.
आरोपी नामे:- 1) रामण्णा दशरथ दांडेकर वय 29 वर्षं राह.राजीव गांधी वॉर्ड ,वरोरा जि.चंद्रपूर
2)अरुण लिलाधर साहा वय 32वर्ष राह.मूळ जिल्हा सीतामढी राज्य बिहार.हल्ली मुक्काम अष्टभुजा वार्ड,चंद्रपुर
फरार अरोपी:-
1)अरविंद सातपुते रा.वरोरा
2) अर्जुन दांडेकर रा.ब्रम्हपुरी
कार्यवाही पथक :-
पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे
पोहवा नितीन साळवे, नितिन कुरेकार,प्रमोद कोटनाके, चापोहवा गजानन मडावी, पो अ अमोल सावे, प्रसाद धुळगंडे उपविभाग चिमुर पथक
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.