एस.आर.एम. समाजकार्य महाविद्यालयात संशोधन पद्धती विषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न…

चंद्रपूर : एस.आर.एम.समाजकार्य महाविद्यालय, पडोली येथे दिनांक ३0 ऑगस्ट ला “संशोधन पद्धती” या विषयावर एकदिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा ” महाविद्यालयाच्या ‘अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ (IQAC) आणी ‘सेंटर फॉर हायर लर्निंग अॅण्ड रिसर्च’ (CHLR) च्या वतीने संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन ‘मातृसेवा सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपूर’ येथील प्रोफेसर डाॅ.केशव वाळके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डाॅ.ममता ठाकूरवार ह्यांनी उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या जेष्ठ प्राध्यापिका व माजी प्रभारी प्राचार्य डाॅ.जयश्री कापसे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डाॅ.संजीव निंबाळकर, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.नितीन रामटेके, सी.एच.एल.आर.चे समन्वयक डाॅ.देवेंद्र बोरकुटे, नॅक समन्वयक डाॅ.सिद्धार्थ वाकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उद्घाटन समारोहाचे संचालन आय.क्यू.ए.सी.चे सह-समन्वयक डाॅ.निलेश ढेकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नॅक समन्वयक डाॅ.सिद्धार्थ वाकुडे यांनी मानले.
दोन सत्रामध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात साधन व्यक्ती म्हणून लाभलेले प्रोफेसर डाॅ.केशव वाळके यांनी कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या रिसर्च स्काॅलरना संशोधनाच्या विषय निवडीपासून ते संशोधनाची रुपरेषा कशी तयार करावी याबाबत मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्षस्थान डाॅ.जयश्री कापसे यांनी भूषविले होते. साधन व्यक्तीचा परिचय व सत्राचे संचालन डाॅ.देवेंद्र बोरकुटे यांनी केले तर आभार महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.कल्पना कवाडे यांनी मानले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रासाठी लाभलेले साधन व्यक्ती जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर चे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डाॅ.गणेश पेटकर यांनी संशोधकाने तथ्य संकलना पासून ते अहवाल लिखाण कसे करावे याबद्दलच सविस्तर मार्गदर्शन सहभागी रिसर्च स्काॅलर्सना केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी डाॅ.संजीव निंबाळकर हे होते. साधन व्यक्तीचा परिचय व या सत्राचे संचालन आय.क्यू.ए.सी.चे सदस्य डाॅ.सुभाष गिरडे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सह-समन्वयक प्रा.संतोष आडे यांनी मानले.
या कार्यशाळेचा समारोप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डाॅ.ममता ठाकूरवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रोफेसर डाॅ.गणेश पेटकर, डाॅ.जयश्री कापसे ,डाॅ.संजीव निंबाळकर, डाॅ.देवेंद्र बोरकुटे,डाॅ.निलेश ढेकरे, डाॅ.सिद्धार्थ वाकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी रिसर्च स्काॅलर्संना “सहभागीत्व प्रमाणपत्र” उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन तसेच कार्यशाळेला लाभलेले साधन व्यक्ती, कार्यशाळेत सहभागी सर्व उपस्थित ,कार्यशाळेच्या यशस्वितेत सहभागी असणाऱ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद ईत्यादिंचे आभार प्रा.नितीन रामटेके यांनी व्यक्त करून कार्यशाळेची यशस्वी सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या कार्यशाळेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पि.एच.डी.पदवी नोंदणी कृत रिसर्च स्काॅलर,प्राध्यापकवृंद तसेच एम.एस.डब्लू.- चतुर्थ सत्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते.