मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू

चंद्रपूर : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाकडून जिल्हास्तरावर या योजनेच्या लाभार्थींचे वय पडताळणी यादी व एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी यादी प्राप्त झाली आहे.
त्याअनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांच्याकडून लाभार्थींचे पडताळणीचे कार्य सुरू आहे. या पडताळणीकरिता यंत्रणेस सहकार्य करावे. जेणेकरून लाभार्थीचे शासन स्तरावरून थांबविलेले लाभ पूर्ववत सुरू करता येईल. अधिक माहिती करिता तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांनी केले आहे.