चंद्रपूर सी. एस. टी. पि. एस. २१० मेघावाट चा कन्व्हेयर बेल्ट स्ट्रॅक्चर कोसळला ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

चंद्रपूर : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन मधील २१० मेघावाट युनिट मध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. २१० मेघावाट च्या कोळसा कन्व्हेयर बेल्टचे स्ट्रॅक्चरच कोसळलेले असून या घटनेने विज निर्मिती केंद्रात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. हि घटना रात्रीच्या वेळेस झाल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु सुरक्षा विभाग आपले कर्तव्य जबाबदारीने निभवत नसल्याने या परिसरातील व त्याठिकाणी काम करणारे कर्मचारी व कामगार आपला जीव धोक्यात घेऊन काम करण्यास भीत आहेत.
हि घटना दिवसा घडली असती तर किती कामगार किंवा कर्मचाऱ्यांचा बळी गेला असता हे सांगणे शक्य नाही. या घटनेमुळे कर्मचारी व कामगार यांनी सुरक्षा विभागावर आपली नाराजगी व रोष व्यक्त करित असल्याची माहिती येत आहे.
या युनिटच्या निर्मितीला बरेच वर्ष झाले असून या युनिट मधील बरेचसे उपकरणे यांची हालत खराब झालेली आहे. त्यांची दुरुस्ती कारणे किंवा नवीन उपकरणे लावणे हि काळाची गरज असतांनाही सुरक्षा विभाग कुंभकर्णी झोप घेत असल्याचे कर्मचारी व कामगार यांच्यात अशी चर्चा असल्याचे दिसून येत आहे. असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.
मागील दोन तीन वर्षांमध्ये प्लांट नंबर ५, ६, ७ मधील झालेल्या हादस्यामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झालेला आहे. प्लांट नंबर ३ मध्ये बायलर रॅलिंगवर चढून काम करीत असतांना रॅलीग तुटल्याने खाली पडून कर्मचारी गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यावेळेसही सुरक्षा विभागावर कुठलेही कारवाई झालेली नाही अशीही चर्चा सुरु आहे. सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी संरक्षण देत आहे का ? असं आज सर्वत्र बोलल्या जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या सुरक्षा विभागात कार्यरत अधिकारी अनेक वर्षापासून एकाच जागी कर्तव्यावर असल्यामुळे महाजेनकोच्या नियमांची पायमाल्ली होत आहे.तसेच यांच्या अकार्यक्षम कर्तव्यामुळे युनिट २१० मेघावाट मध्येच नाही तर इतर युनिट मध्ये मागील दोन तीन वर्षात झालेल्या दुर्घटनामुळे महाजेनकोला झालेल्या नुकसानीला हेच अधिकारी जिम्मेदार असूनसुद्धा वरिष्ठ अधिकारी कार्यवाई का करीत नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांच्याकडून काही फायदा होत आहे का? असेही लोकं बोलतांना दिसून येत आहे.
सुरक्षा विभागाच्या कुंभकर्णी झोपेमुळेच युनिट २१० मेघावाट कोळसा बेल्ट स्ट्रॅक्चर कोसळला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वरिष्ठ अधिकारी यावर काय कार्यवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.