ताज्या घडामोडी

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिष्यवृत्ती  

चंद्रपूर : सन 2025-26 मध्ये अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर, पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांकडून 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 सप्टेंबर 2025 आहे. सदर अर्ज आयुक्त, समाजकल्याण, 3, चर्च पथ, पुणे – 01 यांच्या कार्यालयात सादर करावयाची असल्याचे सहायक आयुक्त, विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये