ताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा ; सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार

 

गडचिरोली  : दि. 5 सप्टेंबर 2025 भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करतांना तसेच गडचिरोली शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने त्यांना दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतांना लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान.

या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतरावजी कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, प्रदेश काँग्रेस सचिव पंकज गुड्डेवार, अखिल भारतीय काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, शिवसेना नेते वासुदेवजी शेडमाके, माजी जि.प. सदस्य जगन्नाथ पा. बोरकुटे, रोहिदासजी राऊत, प्रभाकर वासेकर, ऍड. रामभाऊ मेश्राम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक देवाजी सोनटक्के, दत्तात्र्यय खरवडे, रामकृष्ण ताजने, समशेरखान पठाण, लिनाताई पठाण, मनोहर नवघडे, करोडकर सर, मस्के सर, बाणबले सर, शिंदे सर, पुडके सर, निशाणे सर, अलयनकर सर, बेहरे सर, महेंद्र भगवान शाह काटेंगे, एम. भोयर सर, रुपचंद आकरे, प्रकाश सोनवणे, कृष्णराव नारदेलवार, किशोर झाडे, रमेश गडपायले, राजेंद्र हिवरकर, प्रकाश दुधे, आनंदराव पारधी सर, ज्ञानेश्वर मामोडवार, झाडे सर, गोडबोले सर, माधुरी मडावी, राधेशाम भोयर सर, शिरणकर सर, झाडें मॅडम, अलोणे मॅडम, रोकडे सर, आर. एल. चौधरी यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांनी अवघड परिस्थितीतही विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व दर्जेदार शिक्षण दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये