दीक्षाभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे सुरु असलेली “अम्मा की पढाई ” आठ दिवसात बंद करा – दिक्षाभूमी बचाव संघर्ष समिती

चंद्रपूर (प्र.) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिक्षा भूमी जमीन परिसर येथे अमा की पढाई.. अम्मा स्मारक पुतला आणि चंद्रपूर शहर मधील गांधी चौक मार्केट परिसर येथे अम्मा स्मारक निर्माण करण्यात येत असून त्याला स्थानीक राजनीतिक पक्ष्यासोबत आंबेडकरी जनतेने कडा विरोध केलेला आहे .. ही घटना चंद्रपूर शहरात चर्चेचा विषय बनलेली आहे…
चंद्रपूर शहर चे भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांच्या आई च्या नावाने अम्मा की पढाई शिक्षा अभियान मागील काही दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षा भूमी परिसर च्या कॉलेज मध्ये चालू आहे ..आमदार जोरगेवार यांनी या परिसर मध्ये बुधवार ला आपल्या आई चा पुतडा स्मारक बनवीला आहे याचा विरोध करण्याकरिता आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली व याच्या विरोधात नारेबाजी केली .. स्मारक बनवण्यात येऊ नये याकरिता जनतेणे जिल्हा प्रशासन, सरकार ला निवेदन सादर केले. व आठ दिवसात सर्व बंद करण्यात यावे असे कॉलेज समिती ला अल्टीमेटम दिक्षाभूमी बचाव संघर्ष समितीने पत्रपरिषद मध्ये देण्यात आले आहे . या घटनेचे चंद्रपूर शहरात चर्चेचा विषय मोठया प्रमाणात सुरु असून प्रशासन याकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जातीने लक्ष देत आहे.
पत्रकार परिषद मध्ये आंबेडकरी जनते सोबत कांग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते.