चंद्रपूर जिल्हात चालू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय तसेच खाजगी शिकवणी वर्ग परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावणे सक्तीचे करा – जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे यांची मागणी

चंद्रपूर : राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (अ प) सामाजिक न्याय विभाग चे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी उपजिल्हाधिकारी यांना आपल्या निवेदनातून चंद्रपूर जिल्हात हजारोच्या संख्येने खाजगी वर्ग सुरु आहेत तसेच हजारोच्या संख्येत प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये सुरु असून त्यात लाखो विध्यार्थी, विध्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. बऱ्याचदा सर्व संस्थेमध्ये विध्यार्थी, विध्यार्थीनी सोबत अनुचित, अनैतिक प्रकार घडत असते. अश्या अनेक घटना महाराष्ट्रच नव्हे तर भारतात घडल्याचे अनेक माध्यमातून प्रकाशित झालेले आहे. यानंतर अश्या प्रकारच्या अनुचित, अनैतिक घटना घडू नये याकरिता जिल्हातील प्रत्येक खाजगी शिकवणी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय कॉलेज विशेषतः खाजगी शिकवणी वर्गांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करण्यात यावे त्यामुळे प्रत्येक प्रवर्गातील शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी, विद्यार्थीनीवर कुठल्याही प्रकारचा अनुचित, अनैतिक प्रकार घडण्यास आळा बसेल.
निवेदन देतांना सुरज चौबे, अभय वांढरे, ओम रायपूरे, मनोज बालमावर, सद्दाम अंसारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.