फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर : विविध योजना तसेच अधिक पैशाचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून, शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमीटेड शेगाव (बु.) या पतसंस्थेमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे आावाहन पोलिस विभागाने केले आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील रहिवासी अब्दुल रहेमान शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमिटेडचे संचालक मनोज खोंडे, सुभाष चाफले, श्रीकांत घाटे यांनी 8 फेब्रुवारी 2022 मध्ये शेगाव बु. यथे पत निधीची स्थापना केली. स्थानिक लोकांना एजंट, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करून स्थानिक लोकांना गुंतवणुकीचे प्रलोभन दिले. विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास खूप फायदा होईल, याकरीता वाढीव व्याजदर, दाम दुप्पट परतावा, तात्काळ लोन सुविधा, लखपती बनण्याच्या योजना, पिकनीक कर्ज, तारण कर्ज, बचत गटांना कर्ज अशा विविध योजनांबाबत आमिष दाखविले.
स्थानिक गुंतवणुकदारांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचे संचालक आरोपी मनोज खोडे, सुभाष चाफले, श्रीकांत घाटे व इतर आरोपींनी एकूण 1 कोटी 2 लक्ष 73 हजार 578 रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पोलिस स्टेशन शेगाव बु. येथे भारतीय न्यास संहिता 318(4), 316 (2), 316(5), 3(5) सहकलम 3 एमपीआयडी अॅक्ट 1999 अन्वये गुन्हा नोंद असून तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.
या प्रकरणी ज्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाली आहे, अशा गुंतवणूकदाराच्या रक्कमेच्या याद्या तयार करणे सुरू आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारानी गुंतवणुकीचे कागदपत्र (गुंतवणूकिचे प्रमाणपत्र, रक्कम जमा पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याच्याा पासबुकची झेरॉक्स प्रत) इ. माहितीसह महाराष्ट्र शासन परीपत्रक क्रमांक एम पी आय /प्र.क्र. 09/पोल-11 दिनांक 25/02/2019 अन्वये गुंतवणूकदाराचे परीशिष्ठ- 1 प्रमाणे फार्म भरून देण्याकरीताा आर्थिक गुन्हे शाखा, (पोलिस ठाणे दुर्गापुर परिसर) पोलिस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक पंकज बेसाणे (मो. नं.7588518549) यांच्याशी संपर्क करावा, असे पोलिस विभागाने कळविले आहे.