माजरी पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मोटार सायकलींचा विक्री लिलाव

चंद्रपूर : पोलिस स्टेशन माजरी, येथे बरेच कालावधीपासुन जमा असलेली जंगम मालमत्तेबाबत कोणताही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने एकूण 37 मोटार सायकल, (शासकीय किंमत 1 लक्ष 88 हजार 210 रुपये) यांचा लिलाव होणार आहे. नमुद वाहने टेंडरद्वारे जिथे आहे तिथे वाहनाचे इंजिन व चेचिस नंबर मिटवून व वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक खरेदीदार यांच्याकडून सिलबंद टेंडर मागविण्यात आले आहे.
वाहने परिक्षणाची तसेच अनामत रक्कम व नोंदणी तारीख 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत अनामत रक्कम भरावी लागेल. लिलाव 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत होईल.
लिलावाच्या अटी व शर्ती : वरीलप्रमाणे नमुद केलेल्या जंगम मालमत्तेची जशी आहे तशी जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे, तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाबाबत तपशिलवार अटी व शर्ती वाचुन दाखविण्यात येतील. विक्री रकमेच्या 10 टक्के रक्कमेचा (अनामत) भरणा केल्यावर लिलाव बोली बोलुन झाल्यानंतर ज्यांचे नावाने सदर वाहनाचा लिलाव मंजुर होईल, त्या खरेदीदारास उर्वरित रक्कमचा भरणा त्वरीत लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल. जे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहे (ज्याचे नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.) तेथ विक्री रक्कमेच्या 10 टक्के रकमेचा (अनामत) भरणा करतील व फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावामध्ये प्रवेश मिळणार, त्याचप्रमाणे अनामत रक्कमेचा भरणा करतांना त्याचे प्रमाणपत्र ची आधारकार्डची झेरॉक्स प्रत्त सादर करावी लागेल
सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्विकारणे न स्विकारणे लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता निर्णय घेणे, हे सर्व अधिकार ठाणेदार, पोलीस स्टेशन माजरी यांचे राहतील याची नोंद घ्यावी, असे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी कळविले आहे.