जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली येथील शिक्षिका सौ छाया विठ्ठल गोंडे उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराणे सन्मानीत….

चंद्रपूर : दिनांक 25 नोव्हेंबर 2025 ला विनोबा ॲप मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी संदर्भात अनेक उपक्रम घेण्यात येतात. त्यांची गुणवत्ता वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सदस्य शिक्षण विभागातील सर्वेसर्वा कुमारी अश्विनी सोनवणे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी घेण्यात येणारे सर्व उपक्रम त्यामध्ये अपलोड करण्यात येतात तेव्हा जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली पंचायत समिती राजुरा येथील सौ छाया विठ्ठल गोंडे यांची निवड झाली आणि त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार माननीय अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या शुभहस्ते देण्यात आला सदर कार्यक्रमाला उपस्थित माननीय चवरे सर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच श्री देवानंद रामगिरकर शिक्षण विस्तार अधिकारी यांची उपस्थिती लाभली याप्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच कढोली येथील मुख्याध्यापक खोब्रागडे सर व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी तसेच गावातील नागरिक सौ छाया गोंडे मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा उत्कृष्ट असा फायदा होईल या अनुषंगाने ते नेहमीच कार्यरत असतात.



