स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…

चंद्रपूर : दिनांक 17/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथक चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबीर द्वारे माहिती मिळाली कि, एक इसम बिनबा गेट शांतीधाम परीसरात संशयीतरित्या फिरत असल्याचे खात्रीशीर खबरेवरून शांतीधाम जवळ बिनबा गेट चंद्रपूर येथे सदर विधीसंघर्षीत बालकास पंचासमक्ष ताब्यात घेतले असता त्याचे अंगझडतीत सोन्याची दोन अंगठी असा मुद्देमाल मिळुन आला.
सदर विधीसंघर्षित बालकास मुद्देमालाबाबत विचारले असता घुटकाला वार्ड, चंद्रपूर येथे घरफोडी केल्याचे सांगितले. सदर विधिसंघर्षित बालकाकडून खालील घरफोडीचे गुन्ह्यातील मुद्देमाल बालकाचे वडील व पंचासमक्ष जप्त करण्यात आला. पोस्टे चंद्रपूर शहर अप 754/25. कलम 305(a),331(3), 331(4) BNS 2023 अन्वये गुन्ह्यांची नोंद केली असून एकूण जप्त मुद्देमाल सोन्याचे दोन अंगठी कि 1,00,000/- रु चा माल तसेच सदर विधी. बालक व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करिता तपासी अंमलदार व मुददेमाल मोहरर पो.स्टे चंद्रपूर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई उपविभाग चिमुर पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली.



