क्राईम न्युज

पोलीस स्टेशन पडोली येथील गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई, 72 तासात लोखंड चोरट्यांना केली अटक

चंद्रपूर : पोलीस स्टेशन पडोली येथे दिनांक 23/05/2025 रोजी फिर्यादी अभिलेप परमेश्वर चौधरी वय 41 वर्ष धंदा-खाजगी नौकरी रा. वार्ड क्र. 06 घुग्घुरा ता.जि. चंद्रपुर यांनी पो.स्टे.ला येवुन तक्रार दिली की त्यांचे एमआयडीसी परीसर ताडाळी कडे रोडचे काम सुरु होते. तेथे 06 मीटर लांबीचे 58 नग लोखंडी चैनल ठेवले होते दि. 21/09/2025 चे सकाळी 10:00 वा. जावुन पाहीले असता सदर ठिकाणावरुन 17 नग लोखंडी चेंनल कि. 1,86,000/- रु. किंमतीच्या माल दिसुन आला नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले अशी फिर्यादवरुन पो.स्टे.ला पोस्टे अप क्र. 146/2025 कलम 303 (2) बी.एन.एस प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

मा. पोलीस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे साहेब . चंद्रपुर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक योगेश हिवसे साहेब यांनी गुन्हे शोध पथक पडोली यांना पो.स्टे. परीसरात होत असलेल्या चोरीबाबत तसचे लोखंडी चॅनल चोरीच्या दाखल गुन्हयाची गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्यानुसार डीबी इंचार्ज पोहवा विनोद वानकर, सोबत पोअं प्रतिक हेमके, पोनं धिरज भोयर, पोअं कोमल मोहजे, मपोभं सुचिता उमरे यांना आरोपी शोधकामी मार्गदर्शन करुन गुन्हेगार शोध कामी रवाणा केले व अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना दि. 26/09/2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतगाराकडुन खात्रीशीर खबर मिळाली की एमआयडीसी ताडाळी परीसरात 4 ईसम आहे व त्याचे बाजुला ट्रक उभा आहे ते काहीतरी लोहा विक्री बाबत चर्चा करुन फिरत आहे. त्याबाबात शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो तेथे सदर इसमांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की दि. 21/09/2025 रोजी रात्रो 11:00 ते 12:00 वा.च्या दरम्यान सर्व मित्र मिळुन नामे भारत देवी निषाद यांचे मालकाचे ट्रक क्र.एम एच-34-बीजी-9323 ज्याची चावी याचेच कडे राहते तो ट्रक घेवुन भारत निषादने सांगितले प्रमाणे एमआयडीसी परीसर ताडाली येथे आलो व तेथे लोखंडी चेंनल पडलेल होते ते वजनी असल्याने भारत व आम्ही आजु बाजुला कोणी मिळते का ते पाहीले तेथे रात्रो दोन अनोळखी ईसम जात होते त्यांना रोजी देतो आमचे कंपनीचे काम आहे चॅनल गाडीत लोड करुन द्या असे म्हणुन त्या अनोळखी दोन इसमांना सोबत घेवुन तेथील 17 नग अंदाजे 06 मीटर लांबीचे लोखंडी चेंनल चोरल्याची कबुली दिली. त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी 1) भारत देवि निषाद वय 25 वर्ष धंदा- मजुरी 2) दगदिशकुमार उर्फ गुड्डु ग्यानप्रकाश निषाद वय 27 वर्ष धंदा- ड्रायव्हर 3) सुनिल राकेश निषाद वय 19 वर्ष धंदा- मजुरी 4) सुनिल अवधेश निषाद वय 18 वर्ष धंदा- मजुरी सर्व रा. हनुमान मंदीर मागे लखमापुर ता. जि. चंद्रपुर असे सांगितले. व त्यांचेकडुन 1) कि. 1,86,000/- रु. चे 17 नग लोखंडी चेंनल व 2) कि. 15,00,000/-रु. चा वाहतुक करण्यास वापरलेला महिंद्रा कंपनीचा ब्लाजो 14 चक्का ट्रक एमएच- 34-बीजी-9323 क्रमांकाची असा एकुण 16,86,000/- रु. चा माल जप्त केला

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपुर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक येगेश हिवसे सा. यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषन विभागाचे इंचार्ज पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, पोजं धिरज भोयर, पोभं कोमल मोहजे, मपोअं सुचीता उमरे यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये