कृभको तर्फे शेतक-यांसाठी चर्चासत्र

चंद्रपूर : सावली तालुक्यातील चेक पिरंजी येथे कृषक भारती को-आपरेटिव्ह (कृभको) तर्फे १८ जुलैला शेतक-यांसाठी सामुहीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी ललीत राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून कृभको नागपूरचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक जितेंद्र भामरे उपस्थित होते. याप्रसंगी जितेद्र भामरे यांनी, शेतकरी बांधवांना माती परिक्षण, बिज प्रक्रिया व धान पिकांसाठी लागणाºया अन्नद्रव्य तसेच सुक्ष्म अन्नद्रव्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच धान शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व द्रव्यरुप जैवीक खतांसह धान पिकांमध्ये झिंक सल्फेटचे महत्त्व पटवून देत रासायनिक खतांचा संतुलीत वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी सावली वि. का. स. सो.चे अध्यक्ष मुरलीधर स्वामी यांनी विनाशुल्क सेंद्रिय किट शेतकºयांना उपलब्ध करुन दिले. कार्यक्रमाचे आभार पियूष नेमा यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.