15 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूर : समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येते.
ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणी/ समस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतील, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपुर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावे. प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर तर चवथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यानुसार सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी 1 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी, तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांच्या दालनात करण्यात आले आहे. तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.