वंचित बहुजन महिला आघाडीचा बांधकाम कामगारांच्या समस्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…

दि. ९ जुलै ला वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकार यांच्या नेतृत्वात भर पावसात बांधकाम कामगारांच्या समस्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

केंद्र सरकारनी ४ कामगार संहिता २०२४ अर्थात ४ लेबर कोड पास केलेली आहेत. या कोडमध्ये बांधकाम कामगारांच्या संदर्भात असलेला कायदा गुंडाळून त्यास लेबर कोडच्या सामाजिक सुरक्षा संहिताच्या भागात नॉमिनली बसविलेले आहे. कामगारांचा कायदा कामगारांच्याच विरुद्ध उभा केलेला आहे. या बाबीमुळे शहरी व ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना योजने पासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. तथा ९० दिवसाचे नाका प्रमाणपत्रावर ग्राम अधिकारी व इतर अधिकारी स्वाक्षरी करण्यास नकार देत असल्याने होतं असलेल्या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने कामगारांना घेऊन सतत सुरु असलेल्या पावसातही गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

प्रमुख मागण्या :-
१) प्रत्येक बांधकाम कामगारांना ९० दिवसाच्या (नाहरकत)नाका प्रमाणपत्रवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलीच पाहिजे.
२) इमारत बांधकाम कामगारांना वाटप होणारे साहित्य प्रत्येक तालुक्या तालुक्यात वाटप करण्यात यावे जेणेकरून सर्वाना सोईचे होईल.
३) इमारत बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून देत असलेल्या योजणांचा लाभ विना विलंब तात्काळ देण्यात यावे.

४) जनविरोधी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ तात्काळ रद्द करण्यात यावे.
५) इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळातील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी लावून जनसामान्यांना न्याय देण्यात यावे.
६) ग्राम सेवक संघटनांनी गैरकायदेशीर रित्या ८ अटी शर्ती लादल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात.
७) सादर संदर्भात जनहितार्थ देण्यात आलेले निवेदनावर गेल्या ६ महिन्यापासून काय कारवाई झाली याची सुद्धा माहिती तात्काळ देण्यात यावी.
या धडक मोर्च्यात असंख्य कामगार व वंचित बहुजन आघाडी, शिवराज्य कामगार संघटना, बांधकाम कामगार कृती समिती चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.