सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या ६ तासात अटक – स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी, घरफोडी, अवैध धंदे, व्यवसाय करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे.
दिनांक २०/१०/२०२५ रोजी पोस्टे चंद्रपुर शहर येथे अपराध क्रमांक ७५७/२०२५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे मंगेश प्रमोद रामटेके, वय २७ वर्ष, धंदा खाजगी नौकरी रा. नेहरू शाळेच्या मागे, घुटकाला वार्ड चंद्रपुर हे दिनांक १९/१०/२०२५ रोजी सायंकाळ दरम्यान आपले परिवारासोबत घराला कुलूप लावून बाहेर गेले व दिनांक २०/१०/२०२५ रोजी सकाळ दरम्यान परत आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून चोरी केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे चंद्रपुर शहर परिसरात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, मौजा गडचांदूर येथे राहणारे १) आरीफ कलंदर शेख, वय २८ वर्ष, २) गौरव उर्फ गोलु प्रफुल बोझोकर, वय २० वर्ष, दोन्ही रा. वार्ड क. ०३ गष्डचांदुर, जि. चंद्रपुर असे रेकॉर्डवरील आरोपी सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत. सदर माहितीवरून वर नमुद आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण २,९०,३५०/- रू. सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रूपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर नमुद दोन्ही आरोपींना पुढिल तपासकामी पोस्टे चंद्रपुर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि. सुनिल गौरकार, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता. शशांक बदामवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली आहे.



