एस. आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर येथे “ करियर मार्गदर्शन कार्यशाळा ” संपन्न…

चंद्रपूर : दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क अंतर्गत करिअर गायडन्स आणि इको प्रो संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये “ करियर मार्गदर्शन कार्यशाळा ” आयोजन करण्यात आली.
सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाथे करियर अकॅडमी नागपूर येथील प्राध्यापक नाथे सर यांनी विध्यार्थ्यांना एम. पि. एस. सी./ यू. पि. एस. सी. तसेच विविध स्पर्धा परीक्षा कशा असतात आणि त्या परीक्षाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ममता ठाकुरवार यांनी भूषविले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इको प्रो संस्थेचे संथापाक बंडू धोत्रे उपस्थित होते.
याप्रसंगी मंच्यावर सेवानिवृत्त बिडीओ श्री. उद्धव साबळे, श्री. अतुल वासुदेव, प्रा. डॉ. जयश्री कापसे तसेच महाविद्यालयातील करियर गायडन्स सेलचे सदस्य डॉ. राजीव निंबाळकर, डॉ. कल्पना कवाडे आणि डॉ. सिद्धार्थ वाकुडे उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन प्राध्यापिका डॉ. कल्पना कवाडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रास्थाविक डॉ. सिद्धार्थ वाकुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. किरणकुमार मनुरे यांनी केले या कार्यक्रमासाठी विध्यार्थाचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला आणि विध्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रा. नाथे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.