ताज्या घडामोडी

गरबा – दांडियाच्या तालावर चंद्रपूर थिरकले, खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाट्न…

चंद्रपूर :- शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणणाऱ्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – भाऊचा दांडिया’  चे भव्य आयोजन सोमवार, २२ सप्टेंबर रोजी चांदा क्लब मैदानावर करण्यात आले. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा महोत्सव खासदार प्रतिभा धानोरकर  यांच्या विशेष उपस्थितीत सुरू झाला.

हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ मनोरंजनाचे साधन नसून, शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक मंच आहे. या महोत्सवात गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्यासोबतच स्पर्धकांना दोन दुचाकी आणि रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासोबतच रील स्पर्धेचे देखील यावेळी आयोजन केले आहे.

यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दतात्रय, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, अखिल भारतीय व्यावसायिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्णा कोंड्रा, काँग्रेस तालुकाअध्यक्ष अनिल नरुले, विनोद अहिरकर, माजी नागरसेवक नंदू नगरकर, प्रवीण पडवेकर, सुभाष गौर, प्रशांत दानव, शामकांत थेरे, गोपाल अमृतकर, प्रसन्न शिरवार, भालचंद्र दानव, सचिन कत्याल, प्रमोद बोरीकर,रतन शिलावार, गुंजन येरमे राजुरा पंचायत समिती माजी सभापती कुंदाताई जेणेकर, सुनीता लोढीया, अश्विनी खोब्रागडे, संगीत भोयर, सुनीता अग्रवाल, शालिनी भगत यांची उपस्थिती होती.

हा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार असून, मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीने चंद्रपूरकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये