अनुकंपा नियुक्ती बाबत अनुकंपा धारकांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त यांना दिले निवेदन

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिका येथील खूप वर्षा पासुन अनुकंपा नियुक्ती रखडले होती बरेच वर्षा पासुन अनुकंपा नियुक्ती साठी अनुकंपा धारक प्रतीक्षेत होते परंतु शासन निर्णय आधीन काही तीन व चार लोकांना नियुक्ती मिळत होती आता सध्या स्थितीत 45 अनुकंपा धारकांनची प्रतीक्षा यादी असून मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमा अंतर्गत अनुकंपा भरतीचे धोरण हे मिशन मोड वर राबविण्यात येणार असून सदर नगर विकास विभागाचा परिपत्रक दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी अनुकंपा धोरण लागु करून नियुक्ती देण्याबाबत पत्र आले.
1)सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 17 जुलै 2025 रोजी अनुकंपा धोरण प्रसिद्धी केले परंतु त्या धोरणात काही त्रुटी असल्याने सबंधित विभागात संभ्रम निर्माण होत होता त्या अनुषंगाने
2)सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सुधारित अनुकंपा धोरणाची अमलबजावणी करण्यासाठी शासन परिपत्रक काढले आणि
अ) वर्ग ‘क’ वर्गासाठी मंजूर पदाच्या 20 टक्के प्रमाणे अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावी आणि
ब) वर्ग ‘ड’ वर्गासाठी ज्या ठिकाणी सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून तेथील रिक्त पदाच्या 20 टक्के मर्यादा शिथिल करून नियुक्ती देण्यात यावी तसेच आकृतीबंध मंजूर नसल्यास एक वेळेची विशेष बाब म्हणून वर्ग ‘ड’ मधील अनुकंपा धारकांना नियुक्ती देण्यात यावी,
क) 2024 नंतर ज्या अनुकंपा धारकांनचे नाव बाद होत असेल त्यांनी आपल्या दुसर्या पाल्याचे नाव दाखल करू शकतात.
अशा तरतुदी अन्वये अनुकंपा धोरणा अंतर्गत अनुकंपा भरती मिशन मोड वर घ्यायची असल्याने 100 टक्के भरती होणार असल्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले.
दिनांक 25/8/2025 रोजी चंद्रपूर शहर महानगर पालिका चंद्रपूर येथील अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांना अॅड. श्री. सुजय भारत घडसे यांचा उपस्थितीत सर्व महानगर पालिकेतील अनुकंपा धारकांनी मिळून दिनांक 15/8/2025 पर्यन्त अनुकंपा भरती तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि 100 टक्के भरती करावी याकरिता निवेदन देण्यात आले.
मा. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील साहेबांनी अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही तात्काळ करू असे सांगितले.