असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट मेडिकल चंद्रपूर द्वारा आयोजित, मानवता बुद्ध विहार येथे धम्म शिबीर संपन्न….

चंद्रपूर : दिनांक २८. ९. २०२५ रोज रविवार ला सकाळी दहा वाजता नगीनाबाग सेंड मायकल इंग्लिश स्कूल जवळ मानवता विकास बुद्ध विहार येथे धम्म शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मानसिक शांती व सकारात्मक जीवनमूल्ये विकसित करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ . बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध प्रतिमेला दीपप्रज्वलन व बुद्धवंदना करून झाली. त्यानंतर प्रशिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना आनापान साधना (श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याची पद्धत) याविषयी मार्गदर्शन केले.
आनापान मेडिटेशनमुळे मन:शांती, एकाग्रता, धैर्य व आत्मनियंत्रणाची जाणीव वाढते. तसेच अभ्यासाची आवड, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
या कार्यक्रमात असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट मेडिकल, पदाधिकारी, मान्यवर , व सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक डॉ. जितेंद्र खोब्रागडे यांचे आभार मानण्यात आले.



