घरफोडी करून चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चंद्रपूर :- रामनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण १,५0,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला. यात आरोपी कामरान कदीर शेख (२३वर्ष) रा. रहमत नगर, चंद्रपूर याला अटक करण्यात आली असून नमिर नजीर शेख (२३वर्ष) रा रहमत नगर, चंद्रपूर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुरुवार १८ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपी कामरान शेख आणि त्याचा साथीदार नमीर शेख यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी केले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की कामरान शेख हा सराफा बाजार परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी फिरत आहे. त्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून पंचासमक्ष चोरीचा मुद्देमाल ५ नग सोन्याच्या अंगठ्या किंमत १,५0,000 रुपये जप्त करण्यात आला. अटक आरोपीस व जप्त माल पुढील कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.



