क्राईम न्युज
जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

बल्लारपूर : स्थानिक गुन्हे शाखा व पो. स्टे. बल्लारपूर चे पथक जबरी चोरी प्रकरणी आरोपीचा शोध घेणे करीता बल्लारपूर हद्दीत पेट्रोलिंग तथा cctv फुटेज तपासत असतांना मुखबीरच्या खबरे वरून आरोपी नामे सचिन सुरेश तोकलवार रा. बल्लारपूर वय – 24 वर्ष यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आरोपी नामे करण जीवणे सह सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीवर अप क्र.795/2025 कलम309 (4), 3 (5) भान्यासं दाखल करून आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास करीता पो. स्टे. बल्लारपूर चे ताब्यात दिले. करण जिवणे हा आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरु आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, बल्लारपूर पो. स्टे. पथक व उपविभाग राजुरा गडचांदूर पथक यांनी केली.



