स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, पर राज्यातील ATM कटिंग टोळीचा पर्दाफाश…

चंद्रपूर : दिनांक १५/०९/२०२५ रोजी रात्री दरम्यान चोरटे घुग्घुस अंतर्गत बैंक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसमांनी गॅस कटरचे सहयाने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रूपये चोरी केली अश्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, घुग्घुस जि. चंद्रपुर येथे १८४/२०२५ कलम ३०५, ३३१(४), ३३४ (१) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हाची नोंद करण्यात आली.
नमुद गुन्हयाचे गांर्भीय पाहता, मा. पोलीस अधीक्षक साहेब , चंद्रपुर यांनी पोलीस निरीक्षक, अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना वेगवेगळे पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोथ घेण्याचे आदेश दिले. त्यावरून पो.नि. अमोल काचोरे, स्थागुशा, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुन्हयाच्या घटनास्थळाची पाहणी केली असता, घटने दरम्यान एक पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो विना क्रमांकाच्या वाहनात काही अज्ञात इसम येवुन ऑक्सीजन गॅस कटरचे सहयाने बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM मशिनची कटींग करून पैसे चोरी करून घेवुन गेल्याचे दिसुन आले. त्यावरून सदर पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरे विना क्रमांकाचे वाहनाचे पाठलाग करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथिल दोन वेगवेगळे पथक करून एक पथक देशाचे उत्तर दिशेला व दुसरे पथक दक्षिण दिशेला रवाना करून, सतत १३ दिवस, दिवस-रात्रौ अंदाजे ९०० ते १००० सी.सी.टि.व्हि. कॅमे-याची पाहणी करून तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून अथक परिश्रम घेवुन आरोपी नामे जिल्ली सिरदार खान, वय-५२ वर्ष, रा, सबलगड ता. कामा, जि. भरतपुर, राज्य-राजस्थान यास चिन्नुर, जि. मंचेरियाल, राज्य तेलंगाना येथुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, घुग्घुस, जि. चंद्रपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे तर बाकीचे आरोपी
१) साजीद खान राजुददीन, रा. भाकडोजी, पोलीस स्टेशन फिरोजपुर झिरका, जिल्हा नुह, राज्य हरीयाना
२) शैकुल उन्नस खान, रा. सावलेर, पोलीस स्टेशन पहाडी, ता. पहाडी, जिल्हा, डिग, राज्य राजस्थान
३) काला, रा. गुमटकी, बहकली चौकी, पोलीस स्टेशन नगीना, जिल्हा नुह, राज्य हरीयाणा
हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले,, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा /इम्रान खान, पोअ/किशोर वाकाटे, पोशि/हिरालाल गुप्ता, पोअ/शांक बादामवार, पोअ/मिलींद जांभुळे, चपोअ/रूषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच सायबर पोलीस ठाणे, चंद्रपुर यांनी केली आहे.



