रानटी हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून पाहणी; तातडीने पंचनामा करून आर्थिक मोबदला देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश…

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा हत्तींचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजेलेला असून मागील काही दिवसात गडचिरोली तालुक्यातील जेप्रा, राजगाटा, माल, कळमटोला परिसरात रानटी हत्तींच्या कळपांचा वावर वाढलेला आहे. या हत्तींच्या सततच्या वावरामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेतले व रानटीने केलेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्याचे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना खासदार डॉक्टर किरसान यांनी निर्देश दिले.

यावेळी गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जेप्रा सरपंच श्रीमती शशिकला जंजाळ, उपसरपंच कुंदा लोणबले, सह वन विभाचे अधिकारी, गावातील नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.



